Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Inner sporogenous cell’ in Marathi
‘Inner sporogenous cell’ चा मराठी अर्थ
शब्द: Inner sporogenous cell
उच्चार: इन्नर स्पोरोजीनस सेल
अर्थ: आतल्या बाजूला असलेली स्पोर तयार करणारी पेशी
अधिक माहिती: ॲथर मधील सुरुवातीची आर्किस्पोरीअल (स्पोर पूर्वीची पेशी /स्पोरोसाईट उत्पन्न करणारी पेशी) पेशी ही विभाजीत होऊन दोन पेशी बनवते आतल्या बाजूला असलेली स्पोर तयार करणारी पेशी (स्पोरोजीनस सेल) आणि बाहेरच्या बाजूची भोवतीची प्राथमिक पेशी (प्रायमरी पराएटल सेल). आतल्या बाजूची स्पोरोजिनस पेशी हि पुढे विभाजीत होऊन स्पोरोजिनस टिश्यू बनवते. स्पोरोजिनस टिश्यु ची प्रत्येक पेशी ही मिऑसिस पेशीविभाजनाने मायक्रोस्पोर टेट्रॅड (चार हॅप्लॉइड नर बीजाणू) उत्पन्न करु शकते.