ॲप डाउनलोड करा

Download Sciencekosh App

अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)

बॅच जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा.

🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 स्वातंत्र्यदिन चिरायू होवो 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 स्वातंत्र्याची 75 वर्षे 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳

अभ्यास करण्यात मन लागावे यासाठी आधी ध्येयनिश्चिती करणे आवश्यक आहे. तुम्हाला आयुष्यात काय साध्य करायचे आहे हे ठरवा. चांगली नोकरी मिळावी किंवा चांगला व्यवसाय करून चांगले अर्थार्जन करता यावे हे सर्वच विद्यार्थ्यांचे साधारण ध्येय असते. चागले करिअर घडवण्यासाठी चांगला अभ्यास करणे आवश्यक आहे. माझे अभ्यासात मन लागत नाही. वाचलेले काहीच लक्षात राहत नाही अशा तक्रारी बरेच विद्यार्थी करताना दिसतात. अशावेळी अभ्यास करताना आपण कुठे चुकतोय का, याचा विचार जरूर करावा. विद्यार्थ्यांनी अभ्यासाची पद्धत ठरवताना पुढील गोष्टींचा विचार करावा.

इच्छाशक्ती (Will Power):
अभ्यास करण्याची मनातून इच्छा असणे आवश्यक आहे. तुमच्या आयुष्यातील प्राधान्यक्रम तुम्ही ठरवला आहे का? कुठल्या गोष्टीला तुम्ही आयुष्यात जास्त महत्व देता? चांगले करिअर घडवणे हे तुमच्यासाठी महत्वाचे आहे का हे ठरवा. मग अभ्यासाचे महत्व आपोआप तुम्हाला समजेल व तशी इच्छाशक्तीही जागृत होईल.

मानसिक तयारी व एकाग्रता:
अभ्यासाला बसल्यावर इतर विचार मनातून काढून टाका व फक्त अभ्यासातील विषयावर लक्ष केंद्रित करा.

अभ्यासाची जागा:
अभ्यासासाठी स्वतंत्र रुम असेल तर चांगलेच मात्र नसेल तरीही उपलब्ध जागेत तुम्ही चांगला अभ्यास करू शकता. अभ्यास करण्यासाठीची जागा शांत गोंगाट नसलेली असावी. असे असेल तर उत्तमच मात्र चांगली एकाग्रता असेल तर तुम्ही गोंगाट असलेल्या भर बाजारातही चांगला अभ्यास करू शकता. इच्छाशक्ती, एकाग्रता असेल तर फक्त पाठ्यपुस्तके वाचूनसुद्धा चांगला अभ्यास करता येतो. त्या जोडीला तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन असेल तर आणखी चांगले. [तुमच्या परिसरात तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन (कॉलेज /कोचिंग) उपलब्ध नसेल तर gurukulscience.com वरील अभ्यास साहित्याचा वापर करून तुम्ही MHT-CET ची चांगली तयारी करू शकता].
आपल्याकडे संसाधनांची सुखसोयींची कमतरता आहे असा विचार करू नका. अनेक महान व्यक्तींनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधे अभ्यास करून यश मिळवले आहे. तुमची इच्छाशक्ती आणि एकाग्रता यांच्या सहाय्याने तुम्ही कुठलेही ध्येय गाठू शकता.

अभ्यासाची वेळ:
अभ्यासाची वेळ ठरवताना आपल्या कॉलेज/क्लास ची वेळ वगळून इतर वेळ निवडावी. कुठल्या वेळेत आपली एकाग्रता चांगली असते व अभ्यास करताना अडथळा येणार नाही अशी वेळ निवडावी. पहाटे, सकाळी, दुपारी, संध्याकाळी व रात्री अशा विविध वेळांपैकी कुठली वेळ सोयिस्कर आहे ते बघावे.
ठरावीकच वेळ अभ्यासाठी असावी असे मुळीच नाही. तुम्ही दिवसभर सतत अभ्यास करत राहू शकता. थोड्या थोड्या वेळाचा अवकाश घेऊन वेगवेगळ्या विषयांचा थोडा थोडा अभ्यास करत राहू शकता. MHT-CET, NEET, JEE यासारख्या प्रवेशपरीक्षेसाठीचा प्रचंड अभ्यासक्रम लक्षात घेता मिळेल त्या वेळेचा सदुपयोग करणे हे आवश्यकच ठरते..

मेहनत (Hard Work):
यश मिळवण्याकरिता मेहनत करणे आवश्यकच असते. कुठलीही गोष्ट आयुष्यात विनाकष्ट मिळत नाही. शैक्षणीक यश हे आयुष्यात कधीही फायद्याचेच ठरते. त्यामुळे कधीही मेहनत करण्यापासून मागे हटू नका. अभ्यासात मेहनतच तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाईल.

अभ्यासाचे नियोजन (Time Table):
अभ्यास करण्यासाठी नियोजन करणे महत्वाचे असते. गधेमेहनत करण्यापेक्षा स्मार्ट-वर्क करायला शिका. तुमच्या अभ्यासाला दर दिवशी पूर्ण करता येईल अशा लहान घटकांमधे विभाजित करा. परिक्षेला असलेला वेळ आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिल्लक असलेले दिवस विचारात घेउन सर्व विषय पूर्ण करता येतील अशाप्रकारे दर दिवसाच्या अभ्यासचे नियिजन करा. एका दिवशी एक च विषय अभ्यासायचा की दोन-तीन विषय अभ्यासायचे हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे व क्षमतेप्रमाणे ठरवू शकता. अशाप्रकारे नियोजन केल्याने तुम्हाला तुमचा अभ्यास किती पुर्ण झाला आहे व किती बाकी आहे याची कल्पना सतत येत राहील व तुम्ही वेळेत अभ्यास पूर्ण करू शकाल.

सातत्य (consistency):
बनवलेल्या वेळापत्रकाप्रमाणे रोज अभ्यास पुर्ण करण्याचा प्रयत्न करा. अभ्यासात सातत्य ठेवा म्हणजे आधी शिकलेल्या भागाची पुढे येणार्‍या भागासोबत लिंक लागत राहील. सातत्य ठेवल्याने आखलेल्या वेळापत्रकाप्रमाणे अभ्यास पूर्ण करू शकाल. तसेच रोज अभ्यास करण्याची सवय अंगी बाणत राहील.

चिकाटी (Perseverance):
प्रयत्न न सोडणे याला चिकाटी असे म्हणतात. अभ्यास करताना चिकाटी अंगात बाणवा. अभ्यासातील नवीन भाग समजून घेताना समजत नसल्यास किंवा एखादे गणित सोडवताना जमत नसल्यास प्रयत्न सोडता कामा नये. थोडावेळ तो भाग बाजूला ठेऊन पुन्हा नंतर त्या भागाकडे वळा. तरीही समजत नसेल तर मार्गदर्शक शिक्षकांना विचारा. मात्र समजत नाही म्हणून कुठलाही भाग सोडू नका किवा ऑप्शनला टाकू नका. या चिकाटिचा उपयोग तुम्हाला स्पर्धेमधे एक-एक मार्काने हजारो विद्यार्थ्यांच्या पुढे जाण्यासाठी होइल.

चालढकल न करणे:
अभ्यासात कधीही चालढकल करू नका. आजचा अभ्यास कधीही पुढे ढकलायचा नाही असा नियम करा. परिक्षेला अजून भरपूर वेळ आहे. नंतर करू. आजच कशाला, करू उद्या, आहे ना भरपूर वेळ अशा सबबी कधीही बनवू नका. कुणाकडेही भरपूर वेळ नसतो. गेलेला वेळ केव्हाही परत मिळत नाही त्यामुळे आहे त्या वेळेचा सदुपयोग करत चला. अभ्यास करण्यासाठी वापरलेला वेळ हा कधीही फायद्याचाच ठरेल.

अभ्यास करण्यासाठी वरील बाबींचा विचार केल्यास नक्किच तुमचे अभ्यासात मन लागेल व ध्य्येयपूर्तीकडे वाटचाल करता येईल.

तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा

टेलीग्राम चॅनेलसाठी इथे किंवा चॅनेलचे नाव किंवा चॅनेल आयकॉन वर क्लिक करा

Poll about which class currently studying
11th Admission CET Test Series Sciencet Series Science
अकरावी / बारावी MHT-CET (Biology) चा अभ्यास मराठीतून
ॲप डाउनलोड करा
Download Sciencekosh App
वाचा माहितीपूर्ण विज्ञान लेख …
perseverance and ingenuity on marse surface
Sciencekosh banner
error: