ॲप डाउनलोड करा

Download Sciencekosh App

अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)

बॅच जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा.

🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 स्वातंत्र्यदिन चिरायू होवो 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 स्वातंत्र्याची 75 वर्षे 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳

डॉक्टर व्हायचय ?

वैद्यकिय क्षेत्राचे आकर्षण लहानपणापासून असणारे अनेक विद्यार्थी असतात. हे आकर्षण ‘तू मोठे झाल्यावर काय होणार?’ या नातेवाइक-शेजार्यांच्या प्रश्नाला आई-वडिलांनी सुचवलेल्या ‘डॉक्टर’ – ‘इंजिनिअर’ या ऑप्शन पैकी एक म्हणून दिलेले उत्तर. आणि डॉक्टर होणार असे म्हटल्यावर झालेले कौतुक यामुळे आणखीच बिंबवले जाते.
वैद्यकिय सेवा ही अत्यावश्यक सेवेमधे गणली जाते. चागल्या वैद्यकिय सुविधांची आवश्यकता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वैद्यकिय क्षेत्रामधे नोकरीच्या तसेच स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याच्या चांगल्या संधी उपलब्ध असतात.

डॉक्टर कसे होतात? त्यासाठी काय शिकावे लागते? काय करावे लागते? याची कल्पना अनेक विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश करेपर्यंत नसते. आधीच योग्य माहिती मिळवून तयारी केल्यास उत्तम यश मिळवता येते.

चला तर मग, वैद्यकिय क्षेत्रातील करिअरची ओळख करून घेऊयात. कुठले कोर्सेस करून डॉक्टर होता येते हे बघूयात.

एम.बी.बी.एस. (ॲलोपॅथी डॉक्टर)
एम.बी.बी.एस. हे ‘बॅचलर ऑफ मेडिसिन ॲंड बॅचलर ऑफ सर्जरी’ या पदवीचे लघुरूप आहे. या वैद्यकिय पदवी शिक्षणक्रमात ॲलोपॅथी या आधुनिक वैद्यकशास्त्राचे प्रशिक्षण दिले जाते. ॲलोपॅथी उपचारपद्धतीमधे साधारणतः रोग बरा करण्यासाठी रोगाच्या लक्षणांच्या विरुद्ध परीणाम करणारी रासायनिक औषधे व शस्त्रक्रिया यांचा वापर केला जातो. उपलब्ध असणार्या आधुनिक निदानपद्धतींतील पुरावे हे उपचारांची दिशा ठरवण्यासाठी आधार मानले जातात. ही उपचारपद्धती वापरून रूग्णांवर उपचार करण्यासाठी एम.बी.बी.एस पदवी धारण करणे कायद्याने आवश्यक आहे. एम.बी.बी. एस. अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणार्या विद्यार्थ्याला डॉक्टर ही पदवी वापरता येते व रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक परवानगी मिळते.
या क्षेत्रात पुढे एम.डी. (डॉक्टर ऑफ मेडिसिन) आणि एम.एस. (मास्टर ऑफ सर्जरी) या पदव्युत्तर पदवीचे अभ्यासक्रम आहेत. या विविध प्रकारचे विशेष नैपुण्य मिळवण्यासाठीचे अभ्यासक्रम उपलब्ध असतात. हे स्पेशिॲलिटी अभ्यासक्रम पूर्ण करून हृदयरोग तज्ञ, नेत्र तज्ञ, अस्थिरोगतज्ञ असे प्राविण्य मिळवून विशेषज्ञ डॉक्टर बनता येते.

एम.बी.बी.एस., बी.डी.एस. अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला नाही तर इतर चॉइस म्हणून विद्यार्थी आयुष (AYUSH) वैद्यकिय अभ्यासक्रम म्हणजे, बी.ए.एम.एस. (आयुर्वेदिक) बी.एच.एम.एस. (होमिओपॅथिक), किंवा बी.यु.एम.एस. (युनानी), अभ्यासक्रमाचा विचार करताना दिसतात. आधीच ठरवून या वैद्यकिय शाखांमधे प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी आहे.

बी.डी.एस. (दंतवैद्यक)
बी.डी.एस. हा ‘बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी’ या पदवीचे लघुरूप आहे. दातांचे आजार, विकारांवर औषधोपचार व शस्त्रक्रिया यांचे शिक्षण या वैद्यकशाखेत दिले जाते.

बी.ए.एम.एस, (आयुर्वेदिक वैद्य/डॉक्टर)
बी.ए.एम.एस, हे ‘बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन ॲंड सर्जरी’ या पदवीचे लघुरूप आहे. या वैद्यकिय पदवी अभ्यासक्रमामधे पारंपारिक भारतीय वैद्यकशास्त्राचा आधार असणारे आयुर्वेद व प्राचीन ऋषीमुनींनी रचलेले ग्रंथ यांचे शिक्षण दिले जाते. यासोबतच आधुनिक वैद्यकशास्त्रातील शरीरशास्त्र, रोगप्रतिकारशास्त्र इ. विषयांचेदेखील प्रशिक्षण दिले जाते. आयुर्वेदातील ग्रंथ हे मूळ संस्कृत भाषेत असल्यामुळे संस्कृत भाषेचा अभ्यास देखील आवश्यक असतो.
बी.ए.एम.एस, ही पदवी यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी डॉक्टर किंवा वैद्य ही पदवी वापरू शकतो व रूग्णांवर आयुर्वेदिक उपचारपद्धतीनुसार उपचार करू शकतो.

बी.एच.एम.एस. (होमिओपॅथी डॉक्टर)
बी.एच.एम.एस. हे ‘बॅचलर ऑफ होमिओपॅथीक ॲंड मेडिसिन ॲंड सर्जरी’ य पदवीचे लघुरूप आहे. होमिओपॅथी या विश्वासावर आधारित आहे की शरीर स्वतःच रोग बरे करू शक्ते. या उपचारपद्धतीत औषध म्हणून अतिशय कमी प्रमाणात नैसर्गिक पदार्थ, वनस्पती व खनिज पदार्थांचा वापर केला जातो.

बी.यु.एम.एस. (युनानी हकीम/डॉक्टर)
बी.यु.एम.एस. हे ‘बॅचलर ऑफ युनानी ॲंड मेडिसिन ॲंड सर्जरी’ य पदवीचे लघुरूप आहे. ही उपचार पद्धती प्राचीन युनान देश म्हणजे ग्रीस देशात उगम असलेल्या उपचारपद्धतीवर आधारित आहे. या उपचार पद्धतीत विशिष्ट औषधी गुण असणार्या वनस्पती, नैसर्गिक पदार्थांचा वापर रुग्णांवर उपचारांसाठी केला जातो.

वैद्यकिय प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता:
या सर्व वैद्यकिय पदवी शिक्षणक्रमांना प्रवेश मिळवण्यासाठी 12वी बोर्ड परीक्षेत विज्ञान शाखेत पीसीबी (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी) या गटासह किमान 50% गुण ही किमान पात्रता आवश्यक आहे. त्यासोबतच केंद्र शासनाने आयोजीत केलेल्या नीट (NEET – National Eligibility cum Entrance Test) या प्रवेश परीक्षेत पात्र होण्यासाठी 50 पर्सेंटाइल पर्यंत गुणक्रमांक मिळवणे आवश्यक आहे (50 टक्के नाही, 50 पर्सेंटाइल मिळवणार्यांची टक्केवारी दरवर्षी बदलती असते).

पात्रता परीक्षा:
केंद्र शासनाच्या अखत्यारीतील एन.टी.ए. (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) या संस्थेद्वारे दरवर्षी नीट (NEET) ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत मिळालेल्या गुणांनुसार गुणवत्तायादीतील क्रमानुसार विविध वैद्यकिय अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. मात्र उपलब्ध जागा त्या तुलनेत फार कमी असल्याने फार थोडेच यशस्वी होताना दिसतात. या परीक्षेचा अभ्यासक्रम इयत्ता 11वी व 12वी च्या फिजिक्स, केमिस्ट्री व बायोलॉजी विषयांच्या NCERT च्या अभ्यासक्रमावर आधारीत आहे.

पात्रता परीक्षेचे स्वरूप:
NEET या परीक्षेत एकूण 180 प्रश्न (फिजिक्स- 45 प्रश्न, केमिस्ट्री- 45 प्रश्न, बायोलॉजी- 90 प्रश्न) विचारले जातात व ही परीक्षा एकूण 720 गुणांची असते. प्रत्येक बरोबर उत्तराला 4 गुण दिले जातात तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जातो. याला निगेटिव्ह मार्किंग असे म्हणतात. हे 180 प्रश्न 180 मिनिटांत (3 तासांत) सोडवायचे असतात.

प्रवेशासाठीची स्पर्धा:
दरवर्षी देशभरातून 14 ते 15 लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात मात्र एकूण एम.बी.बी.एस. च्या जागा केवळ 83 हजार आहेत तर बी.डी.एस. च्या केवळ 27 हजार जागा आहेत. इतर वैद्यकीय शाखाच्या 52 हजार जागा उपलब्ध आहेत. यामुळे प्रवेशासाठी कीती तीव्र स्पर्धा आहे हे दिसून येते. एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्यासाठी NEET परीक्षेत 720 पैकी 650 पेक्षा जास्त गुण मिळवणे आवश्यक असते.

NEET साठी तयारी कशी करावी:
इयत्ता दहावी ची परीक्षा संपल्यानंतर लगेच अकरावीची व त्यासोबतच NEET ची तयारी सुरु करावी. त्यासाठी तिन्ही विषयांच्या NCERT च्या पाठ्यपुस्तकांचा सखोल अभ्यास करा. त्यानंतरच इतर पुस्तकांचा अभ्यास करा. प्रत्येक घटकवार व चॅप्टरवाइज MCQs चा सराव करावा तसेच मागील वर्षांमधे विचारलेल्या प्रश्नांचा सराव करावा. या अभ्यासासाठी तुम्ही कॉलेज किंवा क्लासच्या शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊ शकतात. तयारीच्या तपशीलवार माहितीसाठी या वेबसाइट वरील ‘Study Guide’ या सेक्शन चा वापर करा.

शाळेपासूनच NEET ची तयारी:
NEET व JEE यासारख्या परीक्षांचा मोठा अभ्यासक्रम तसेच असलेली तीव्र स्पर्धा यामुळे अनेक विद्यार्थी शाळेपासूनच या परिक्षेची तयारी सुरु करतात. तुम्ही 7 वी, 8 वी, 9 वी त असाल तर तुम्ही दरवर्षी एका वर्षाच्या एका विषयाची तयारी करु शकता. ज्यावेळी तुम्ही अकरावीला याल त्यावेळी तुम्हाला बर्याच सिलॅबसचा परीचय झालेला असेल त्यामुळे अकरावी बारावीला अभ्यास अतिशय सोपा होइल.

वैद्यकिय क्षेत्रासाठी आवश्यक मानसिक क्षमता:
वैद्यकिय क्षेत्रात काम करण्यासाठी तुम्ही मानसिकदृष्ट्या कणखर असणे आवश्यक आहे. डॉक्टरला सतत रोगी, जखमी रुग्णांच्या सहवासात रहावे लागते. अशावेळी त्यांच्या तक्रारी शांतपणे एकून घेण्याची क्षमता, सहनशीलता, त्वरेने निर्णय घेण्याची क्षमता, उपलब्ध उपचार पर्यायांतून योग्य पर्याय निवडण्याची क्षमता. रोगांची लक्षणे व औषधांची नावे लक्षात ठेवण्यासाठी चांगली स्मरणशक्ती हे गुण तुमच्या अंगी असणे आअवश्यक आहे. यातील काही क्षमता प्रशिक्षण कालावधीत शिकता येतात मात्र काही मुळातच अंगी असाव्या लागतात.

शारीरीक क्षमता:
डॉक्टरांना बर्याच वेळा रात्री उशीरापर्यंत जागवे लागते. तसेच हॉस्पिटलच्या शिफ्ट नुसार रात्रपाळीतही काम करावे लागते. उशीरापर्यंत काम करण्याची तयारी व क्षमता, वेळी अवेळी काम करण्यास तयार असण्याची क्षमता ही तुमच्यामधे असणे आवश्यक आहे.

वैद्यकक्षेत्राशी निगडीत इतर करिअर मार्ग:
वैद्यकिय क्षेत्राशी निगडीत इतरही करिअरचे मार्ग आहेत जे तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार व आवडीनुसार निवडू शकता.
नर्सिंग (डिप्लोमा नर्सिंग/ बी.एससी. नर्सिंग):
फार्मसी (डी.फार्म/बी.फार्म):
मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी (डी.एम.एल.टी.):
फिजिओथेरपी (बी.पी.टीएच.):
ऑक्युपेशनल थेरपी (बी.ओ.टीएच.)
व्हेटरनरी सायंस (बी.व्ही.एससी.):
हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन:
बायोमेडिकल इंजिनिअरींग: वैद्यकिय उपकरणांचे उत्पादन, देखभाल व दुरुस्ती

या प्रत्येक करिअरची विस्तृत माहीती आपण पुढच्या लेखांमधे घेणार आहोत.

तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा

टेलीग्राम चॅनेलसाठी इथे किंवा चॅनेलचे नाव किंवा चॅनेल आयकॉन वर क्लिक करा

Poll about which class currently studying
11th Admission CET Test Series Sciencet Series Science
अकरावी / बारावी MHT-CET (Biology) चा अभ्यास मराठीतून
ॲप डाउनलोड करा
Download Sciencekosh App
वाचा माहितीपूर्ण विज्ञान लेख …
perseverance and ingenuity on marse surface
Sciencekosh banner
error: