Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Self sustaining communities’ in Marathi
‘Self sustaining communities’ चा मराठी अर्थ
शब्द: Self sustaining communities
उच्चार: सेल्फ सस्टेनिंग कम्युनिटीज
अर्थ: स्वयंपूर्ण शाश्वत समुदाय
अधिक माहिती: Self sustaining communities किंवा स्वयंपूर्ण समुदाय म्हणजे विविध सजीवांचा किंवा मनुष्यांचा समूह जो आपल्या गरजा समूहाअंतर्गतच पूर्ण करतो. उदा. जंगल किंवा वनामधे वनस्पती सुर्यप्रकाश, ऑक्सिजन, पाणी व जमिनीतील पोषक तत्वे वापरून अन्न तयात करतात. हा अन्न्साठा शाकाहारी प्राणी वापरतात, मांसाहारी प्राणी इतर प्राण्यांचा अन्न म्हणून वापर करतात व सूक्ष्मजीव मृत सजीवांच्या शरीराचे विघटन करतात. वनस्पतींच्या परागीभवनासाठी कीटक सहाय्य करतात अशाप्रकारे हा स्वयंपूर्ण शाश्वत समूदाय असतो कारण तेथील सजीवांच्या गरजा तिथेच पुर्ण होतात.