Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Pollen grain’ in Marathi
‘Pollen grain’ चा मराठी अर्थ
शब्द: Pollen grain
उच्चार: पोलन ग्रेन
अर्थ: परागकण
अधिक माहिती: Pollen grain म्हणजे परागकण हे वनस्पतीमधील नर पुनरुत्पादक संरचना आहे. परागकण हे परागकोषात तायर होतात. परागकोषातील स्पोरोजिनस टिश्यूच्या पेशी या मिऑसिस ने बिभाजीत होऊन चार हॅप्लॉइड पेशी तयार होतात. या पेशी पोलन ग्रेन च्या स्वरूपात विकसित होतात. पोलन ग्रेन हे स्पोरोडर्म या दोन आवरणांनीनी (एक्झाइन व इन्टाइन) वेडलेले असते. एक्झाइन हे अतिशय टिकाऊ व प्रतिरोधी स्पोरोपॉलेनीन ने बनलेले असते. पोलन ग्रेन हे अतिशय लहान स्वरूपातील मेल गॅमेटोफाइट (नर जननपेशी बनवणारे शरीर) असते ज्यातील हॅप्लॉइड पेशी दोन वेळा मायटॉसिस ने विभाजीत होते. पहिल्या मायटॉसिस नंतर एक व्हेजिटेटिव्ह पेशी व एक जनरेटिव्ह पेशी तयार होते. जनरेटिव्ह पेशीमधील दुसर्या मायटॉसिस पासून दोन गॅमेट (जननपेशी) बनतात.