Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Luteinizing hormone (LH)’ in Marathi
‘Luteinizing hormone (LH)’ चा मराठी अर्थ
शब्द: Luteinizing hormone (LH)
उच्चार: ल्युटनायझिंग हॉर्मोन
अर्थ: पितपिंडकारी संप्रेरक, पिवळे पिंड बनवणारे संप्रेरक
अधिक माहिती: Leuteinizing hormone म्हणजेच ‘पितपिंड बनवणारे संप्रेरक’ हे पिट्युटरी ग्रंथीच्या समोरच्या भागाने बनवलेले संप्रेरक आहे. या संप्रेरकाच्या प्रभावामुळे ओव्हरी (अंडाशय) मधे पूर्ण वाढ झालेली पुटिका (फॉलिकल) फुटते व त्यातील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर पडते. याला ओव्ह्युलेशन (अंडमोचन) असे म्हणतात. ओव्हरीमधे राहिलेल्या फॉलिकलचे रुपांतर पितपिड (कॉर्पस ल्युटिअम) मधे होते.