Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Transverse Section (T. S.) of Anther’ in Marathi
‘Transverse Section (T. S.) of Anther’ चा मराठी अर्थ
शब्द: Transverse Section (T. S.) of Anther
उच्चार: ट्रान्स्व्हर्स सेक्शन ऑफ अँथर
अर्थ: अँथरचा आडवा छेद / काप
अधिक माहिती: मॅच्युअर (परिपक्व) अँथर वॉल (अँथरची भिंत) मध्ये चार लेयर्स (थर) असतात. (एपिडर्मिस, एन्डोथेसीअम, मिडल लेयर आणि टॅपेटम). एपिडर्मिस (बाह्यत्वचा) हा टॅब्यूलर (सपाट)) पेशींचा बनलेला आउटरमोस्ट (सर्वात बाहेरचा) प्रोटेक्टिव्ह लेयर (संरक्षक थर) आहे. एपिडर्मिसच्या खाली एन्डोथेसीअम हा स्तर असतो. हा फायब्रस थिकनिंग (जाड तंतुमय) असलेल्या रेडियली इलॉंगेटेड (मध्यापासुन बाहेरच्या दिशेने (त्रिज्याकार) वाढलेल्या) पेशींचा बनलेला स्तर आहे. एन्डोथेसीअमच्या आतमध्ये पातळ पेशीभित्तिका असलेल्या पेशींच्या दोन-तीन स्तरांनी बनलेला मिडल लेयर (मध्यम थर) असतो जो ॲथरच्या वाढीदरम्यान नष्ट होऊ शकतो. ॲथर वॉल चा सर्वात आतील स्तर टॅपेटम हा सर्वात न्यूट्रीटीव्ह (पोषक) स्तर असतो. टॅपेटम हे आतील स्पोरोजीनस टिश्यू (स्पोर बनविणाऱ्या पेशींपासून बनलेला टिश्यू) भोवती आवरण बनवतो. टॅपेटम हा ॲंथरमधे विकसित होणार्या पोलन ग्रेन चे पोषण करतो. स्पोरॅंजिअम मधे असणार्या स्पोरोजिनस टिश्यु ची प्रत्येक पेशी ही मिऑसिस पेशीविभाजनाने मायक्रोस्पोर टेट्रॅड (चार हॅप्लॉइड नर बीजाणू उत्पन्न करु शकते.