Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Structure of microspore’ in Marathi
‘Structure of microspore’ चा मराठी अर्थ
शब्द: Structure of microspore
उच्चार: स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर
अर्थ: मायक्रोस्पोरची रचना
अधिक माहिती: मायक्रोस्पोर हे पुढे पोलन ग्रेन च्या स्वरूपात विकसित होते. बहुतेक पोलन ग्रेन (परागकण) ही एक नॉन-मोटाइल (चलन-वलन, हालचाल न करणारे), हॅप्लॉइड (एकगुणी/सर्व मूळ क्रोमोझोम्स चा एकच संच असलेली पेशी), सिंगल न्यूक्लिअस (एकच केंद्रक) असलेली युनिसेल्ल्युलर बॉडी (एकपेशीय पिंड/शरीर) असते. पोलन ग्रेन (परागकण) भोवती स्पोरोडर्म नावाची दोन स्तर असलेली वॉल (भिंत) असते. आऊटर लेयर (बाहेरचा स्तर) ला एक्झाइन असे म्हणतात व आतल्या लेयर ला इन्टाइन असे म्हणतात. एक्झाइन (exine) हा स्तर जाड असतो आणि कॉम्प्लेक्स (जटिल), नॉन-बायोडिग्रेडेबल (जैविकरीत्या विघटन न होऊ शकणाऱ्या), स्पोरोपॉलिनिन (sporopollenin) नावाच्या पदार्थाने बनलेला असतो. इन्नर वॉल लेयर (आतील स्तर) ला इन्टाईन (intine) हा सेल्युलोज (ग्लुकोजच्या लांब साखळ्या/ग्लुकोज शर्करेचे बहुवारक) आणि पेक्टिन (वेगवेगळ्या शर्करांची साखळी/ बहुवारक) चा बनलेला असतो. पोलन ग्रेनच्या स्पोरोडर्म वर काही ठिकाणी एक्झाइन ही खूप थिन पातळ असते त्या जागेला Germ-pores असे म्हणतात. जर्म पोअर्स म्हणजे अंकुरित (जर्मिनेट) झालेल्या परागकणातील परागनलिके (पोलन ट्युब) चा अंकुर (जर्म) बाहेर येण्यासाठीचे छिद्र.