Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Red Blood Corpuscles (RBCs)’ in Marathi
‘Red Blood Corpuscles (RBCs)’ चा मराठी अर्थ
शब्द: Red Blood Corpuscles (RBCs)
उच्चार: रेड ब्लड कॉर्पस्कल्स
अर्थ: लाल रक्तपेशी/रक्तकणिका, तांबड्या रक्तपेशी, लोहित रक्तपेशी
अधिक माहिती: मानवी लाल रक्तपेशी या आकाराने लहान, चपट्या, वर्तुळाकार, दोन्ही बाहूंनी मध्यभागी दबलेल्या (द्वीअंतर्वक्र) असतात. मानवाच्या लाल रक्तपेशी मधे केंद्रक नसते. या पेशी त्यात विपुल प्रमाणात असणार्या हिमोग्लोबीन या लोहअणुयुक्त प्रथिनामुळे लाल रंगाच्या दिसतात. लाल रक्तपेशी ऑक्सिजन व कार्बनडायऑक्साइड चे वहन करण्याचे कार्य करतात. फुफ्फुसात हिमोग्लोबीनसोबत संयोग झाल्याने ऑक्सिजन रक्तात विरघळतो. प्रत्येक घनमिलीमीटर रक्तामध्ये 50-60 लक्ष लाल रक्तपेशी असतात. लाल रक्तपेशींची निर्मिती अस्थिमज्जेत (बोन मॅरो) होते व त्या सुमारे 100 ते 127 दिवस जगतात.