Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Plantae (Kingdom)’ in Marathi
‘Plantae (Kingdom)’ चा मराठी अर्थ
शब्द: Plantae (Kingdom)
उच्चार: प्लॅंटी किंगडम
अर्थ: वनस्पती सजीवसृष्टी
अधिक माहिती: बहुपेशीय व एकपेशीयपेशीय दृश्यकेंद्रकी स्वयंपोषी सजीवांचा समावेश वनस्पती सृष्टीत केला जातो. दृश्यकेंद्रकी पेशीत पटलबद्ध केंद्रक व पेशीअवयव असतात. पेशी भोवती पेशीभित्तीका असते जी सेल्युलोज या शर्करेच्या बहुवारकापासून बनलेली असते. स्वयंपोषी वनस्पती पेशीत हरितलवके असतात ज्यात प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेद्वारे सूर्यप्रकाशातील उर्जेचा वापर करून शर्करा बनवली जाते. उदाहरणे- झाडे, झुडुपे, गवत इ.