Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Pipet Bulb’ in Marathi
‘Pipet Bulb’ चा मराठी अर्थ
शब्द: Pipet Bulb
उच्चार: पायपेट बल्ब
अर्थ: शोषनळी वर लावण्याचा रबरी पोकळ शोषक गोळा
अधिक माहिती: हा रबरी गोळा शोषनळी मधे द्रव पदार्थ शोषण्यासाठी व बाहेर टाकण्यासठी वापरला जातो. शोषनळीच्या वरच्या टोकावर हा रबरी गोळा बसवला जातो. दाब दिल्यानंतर त्यातून हवा बाहेर पडते व आत निर्वात पोकळी निर्माण होते. शोषनळीचे खालचे टोक द्रव पदर्थामधे बुडविल्यास व हळूहळू दाब सोडल्यास आतील हवेच्या कमी दाबामुळे द्रवपदार्थ शोषनळीच्या आत ओदढला जातो. व दाब वाढवल्यास पदार्थ बाहेर सोडला जातो. या रबरी गोळ्याचा वापर केल्यास शोषनळीमधे तोंडाने द्रवपदार्थ शोषण्याची आवश्यकता नसते त्यामुळे शोषनळीचा सुरक्षित वापर करता येतो.