Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Pasteurisation’ in Marathi
‘Pasteurisation’ चा मराठी अर्थ
शब्द: Pasteurisation
उच्चार: पास्चरायझेशन
अर्थ: पाश्चरीकरण, लुइस पाश्चर या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञाने विकसित केलेली अन्न टिकवण्याची पद्धत
अधिक माहिती: द्रव अन्नपदार्थ दिर्घकाळ टिकविण्याची पद्धत. या प्रक्रियेत दूध किंवा तत्सम द्रव अन्न पदार्थ हे उच्च तापमानापर्यंत तापवले जाते, काही ठराविक कालावधीसाठी त्या तापमानावर ठेवले जाते व नंतर ताबडतोब थंड केले जाते उदा., दूध 80° सेल्सिअसला 15 मिनिटे तापवले जाते व नंतर लगेच थंड केले जाते. याप्रक्रियेमुळे अन्नपदार्थातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो व त्यामुळे अन्नपदार्थ दीर्घकाळ टिकतो.