Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Ovum’ in Marathi
‘Ovum’ चा मराठी अर्थ
शब्द: Ovum
उच्चार: ओव्ह्युम
अर्थ: अंडपेशी, डिंबपेशी
अधिक माहिती: Ovum/Oocyte किंवा अंडपेशी/डिंबपेशी या स्त्रीच्या ओव्हरी (अंडाशय) मधे विकसित होत असणार्या असंख्य फॉलिकल (पुटीका) मधे असतात. प्रत्येक मासिक चक्रामधे त्यापैकी एका पुटीकेचा व त्यातील ऊसाइट (अंडपेशी/ डिंबपेशी) चा ‘पुटीका ग्रंथी संप्रेरक’ (Follicle stimulating hormone) च्या प्रभावामुळे विकास होण्यास सुरूवात होते. Leuteinizing hormone म्हणजेच ‘पितपिंड बनवणारे संप्रेरक’ या संप्रेरकाच्या प्रभावामुळे ओव्हरी (अंडाशय) मधे पूर्ण वाढ झालेली पुटिका (फॉलिकल) फुटते व त्यातील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर पडते. याला ओव्ह्युलेशन (अंडमोचन) असे म्हणतात. अंडपेशी ही झोना पेलुसिडा व करोना रॅडिआटा च्या स्तरांनी वेढलेली असते.