Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Class E Fire’ in Marathi
‘Class E Fire’ चा मराठी अर्थ
शब्द: Class E Fire
उच्चार: क्लास इ फायर
अर्थ: आगीच्या प्रकाराचा ‘इ’ वर्ग, विद्युतपुरवठा किवा विद्युतउपकरणांमुळे लागलेली आग
अधिक माहिती: या प्रकारची आग ही इलेक्ट्रीकल सामान, फिटिंग इत्यादीं साधनांमधे दोष निर्माण झाल्यास ठिणग्या पडल्यामुळे लागलेली आग असते. या प्रकारची आग ही विद्युतपुरवठा बंद करून कार्बन डायऑक्साइडसारख्या आग प्रतिबंधकाच्या साहाय्याने विझवली जाते. विजेमुळे भडकलेली आग विझविण्यासाठी वाळू किंवा मातीचाही वापर करता येतो.