Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Ovary (animal)’ in Marathi
‘Ovary (animal)’ चा मराठी अर्थ
शब्द: Ovary (animal)
उच्चार: ओव्हरी
अर्थ: अंडाशय
अधिक माहिती: Ovary किंवा अंडाशय हे स्त्री-प्रजनन संस्थेतील पुनरुत्पादक अवयव आहे. स्त्रीशरीरामधे दोन अंडाशय असतात. अंडाशयामधे स्त्री जननपेशी म्हणजेच ओव्ह्युम/ऊसाइट (अंडपेशी) ची निर्मिती होते. साधारणतः प्रत्येक महिन्याला एक अंडपेशी आळी-पाळीने एका एका अंडाशयातून उदरपोकळीमध्ये सोडली जाते. ओव्हरीद्वारे स्त्री- पुनरुत्पाद्क संस्थेतील महत्वाचे इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरके तयार करुन स्रवली जातात