Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Bacteria’ in Marathi
‘Bacteria’ चा मराठी अर्थ
शब्द: Bacteria
उच्चार: बॅक्टेरीआ
अर्थ: जीवाणू
अधिक माहिती: जिवाणू हे डोळ्यांनी न पाहता येण्याएवढे लहान सूक्ष्मजीव असतात. जीवाणू पेशी आदिकेंद्रकी असते. पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात. जीवाणू पेशीभोवती पेशीभित्तिका असते. काही जीवाणू हे स्वतंत्र सजीव म्हणून जगतात तर काही परजीवी (parasite) असतात ते. एकाच जागेत जीवाणूची संख्या वाढल्याने वसाहती (Colonies) बनतात.