Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Mucormycosis’ in Marathi
‘Mucormycosis’ चा मराठी अर्थ
शब्द: Mucormycosis
उच्चार: म्युकरमायकॉसिस
अर्थ: म्युकर नावाच्या बुरशीमुळे होणारा आजार
अधिक माहिती: म्युकर नावाची बुरशी ही सर्वत्र आढळते मात्र ती सहसा मनुष्यामधे आजार निर्माण करत नाही कारण मनुष्याची प्रतिकारक्षमता या बुरशीला शरीरात प्रवेश करून संसर्ग करू देत नाही. मात्र काही रोगांमुळे, किंवा अन्य कारणांमुळे रोगप्रतिकारक्षमता कमी झाल्यास ही बुरशी संसर्ग निर्माण करू शकते. मनुष्याची रोगप्रतिकारक्षमता कमी करणार्या औषधांमुळे ही या बुरशीच्या संसर्गाला संधी मिळू शकते. Mucormycosis ची लक्षणे म्हणजे चेहेर्याला एका बाजूला सूज येणे, डोकेदुखी, नाक व नाकामागची पोकळी (सायनस) चोंदणे. नाकाच्या वर व तोंडाच्या आतील वरच्या बाजूला काळे व्रण निर्माण होणे, ताप येणे ही आहेत. Mucormycosis ची लक्षणे आढळल्यास त्वरीत वैद्यकिय सल्ल्याने उपचार घ्यावेत. Mucormycosis ला Zygomycosis या नावानेही संबोधले जात असे. सर्वसामान्य भाषेत याला ब्लॅक फंगस (काळी बुरशी) असेही म्हणतात.