Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Micropyle’ in Marathi
‘Micropyle’ चा मराठी अर्थ
शब्द: Micropyle
उच्चार: मायक्रोपाईल
अर्थ: स्त्रीबीजांडाचे मुख/द्वार
अधिक माहिती: ओव्ह्यूल (स्त्रीबीजांड) च्या शिखरावर/वरच्या टोकावर असलेल्या अरुंद/ बारीक छिद्राला मायक्रोपाईल (स्त्रीबीजांडाचे द्वार) असे म्हणतात. मायक्रोपाईल मधून पोलन ट्यूब (परागनलिका) ही ओव्ह्यूलच्या आत प्रवेश करू शकते. अॅनाट्रॉपस (अधोमुखी/खालच्या दिशेने तोंड असलेला) ओव्ह्युलमध्ये मायक्रोपाईल (स्त्रीबीजांडाचे मुख/द्वार) ही खालच्या दिशेने तोंड असलेली असते आणि ते फ्युनिक्युलस (स्त्रीबीजांडाचे देठ) ला लागून असते.