Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘in vitro pollen germination’ in Marathi
‘in vitro pollen germination’ चा मराठी अर्थ
शब्द: in vitro pollen germination
उच्चार: इन व्हिट्रो पोलन जर्मिनेशन
अर्थ: प्रयोगशाळेतील उपकरणामधे परागकणांचे अंकुरण घडवून आणणे
अधिक माहिती: परागकण अंकुरित होण्यासाठी अनुरुप स्टिग्माच्या पृष्ठभागावर असलेली नैसर्गिक परिस्थिती आवश्यक असते. मात्र परागकण प्रयोगशाळेत सिंथेटिक मेडीयम (कृत्रिम पोषणमाध्यम) मध्ये देखील अंकुरित होण्यास प्रवृत्त केले जाऊ शकते. इन व्हिट्रो म्हणजे काचेच्या उपकरणांमध्ये पोषणमाध्यमातील सुक्रोज (साखर) मुळे पराग अंकुरण होते आणि परागनलिकेची वाढ होते. पोषण्माध्यमात आणखी बोरिक अॅसिड घातल्यास पराग अंकुरण, परागनलिका बनणे सुलभ होते आणि जलद/ अधिक वेगाने होते.