Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Exine’ in Marathi
‘Exine’ चा मराठी अर्थ
शब्द: Exine
उच्चार: एक्झाइन
अर्थ: पोलन ग्रेन स्पोरोडर्म चा सर्वात बाहेरचा कठीण स्तर
अधिक माहिती: पोलन ग्रेन (परागकण) भोवती स्पोरोडर्म (शब्दशः अर्थ – बीजाणूभोवतीची त्वचा) नावाची दोन स्तर असलेली वॉल (भिंत) असते. स्पोरोडर्मच्या बाहेरच्या स्तराला Exine असे म्हणतात. एक्झाइन हा जाड स्तर असतो आणि कॉम्प्लेक्स (जटिल), नॉन-बायोडिग्रेडेबल (जैविकरीत्या विघटन न होऊ शकणाऱ्या), स्पोरोपॉलिनिन (sporopollenin) नावाच्या पदार्थाने बनलेला असतो. एक्झाइन हे स्मूथ (गुळगुळीत) किंवा स्कल्पचर्ड पॅटर्न (कोरीव नक्षी) असलेले (प्रजातीच्या वैशिष्ट्यानुसार वेगवेगळे) असू शकते. एक्झाइन हे केमिकल रेझिस्टंट (रसायन प्रतिरोधक/ रसायनांचा परिणाम न होणारे) असते. पोलन ग्रेनच्या पृष्ठभागावर काही ठिकाणी एक्झाइन ही खूप पातळ असते त्या जागेला जर्म पोअर्स (अंकुर बाहेर येण्यासाठीचे छिद्र) असे म्हणतात. हे जर्म पोअर्स, पोलन ग्रेन (परागकण) च्या जर्मिनेशन (अंकुरणे) दरम्यान निर्माण होणाऱ्या पोलन ट्यूब (परागकण नलिका) ला पोलन ग्रेन मधून बाहेर येण्यासाठी असते.