Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Diploid secondry nucleus’ in Marathi
‘Diploid secondry nucleus’ चा मराठी अर्थ
शब्द: Diploid secondry nucleus
उच्चार: डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लिअस
अर्थ: द्विगुणी दुय्यम केंद्रक
अधिक माहिती: विकसित फिमेल गॅमेटोफाइट म्हणजेच एम्ब्रिओ सॅक मधील मध्यवर्ती मोठ्या पेशी मधील दोन हॅप्लॉइड न्युक्लीआई (एकगुणी पेशीकेंद्रक) हे फर्टिलायझेशन च्या आधी एकीकृत होतात व Diploid secondry nucleus (द्विगुणी दुय्यम केंद्रक) बनवतात. डबल फर्टिलायझेशन (द्विफलन) मधील दुसर्या मेल गॅमेट द्वारे डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लिअस चे फलन होते व त्यामुळे तयार झालेले ट्रिप्लॉइड न्युक्लिअस व पेशी ही पुढे मायटॉसिस ने विभाजीत होऊन बीजामधील एंडोप्सर्म बनवते.