Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Clotting factors’ in Marathi
‘Clotting factors’ चा मराठी अर्थ
शब्द: Clotting factors
उच्चार: क्लॉटिंग फॅक्टर्स
अर्थ: रक्ताची गुठळी बनन्यासाठी आवश्यक घटकपदार्थ
अधिक माहिती: जखम झाल्यामुळे किंवा इतर कारणांनी रक्तस्राव होत असल्यास रक्तस्राव थांबण्यासाठी त्या ठिकाणी रक्ताची गाठ बनणे आवश्यक असते. अशा वेळी रक्तातील Clotting factors (उदा. फिब्रिनिजेन, प्रोथ्रॉम्बीन) हे कार्यरत होतात व रक्त साकळण्यास मदत करतात. जखम झाल्यास त्या जागी कार्यरत प्रोथ्रोम्बीनेज (Factor Xa) हे प्रोथ्रॉम्बीन ला तोडून त्याचे थ्रॉम्बीन मधे रूपांतर करते. नंतर थ्रॉम्बीन हे फिब्रिनोजेन चे रूपांतर फिब्रिन मधे करते व त्यानंतर फिब्रिन एकमेकांना चिकटून त्याची इतर घटकांसह गुठळी बनते.