Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Blood group matching’ in Marathi
‘Blood group matching’ चा मराठी अर्थ
शब्द: Blood group matching
उच्चार: ब्लड ग्रुप मॅचिंग
अर्थ: रक्तदाता व रक्तग्राहीचा रक्तगट जुळतो की नाही हे तपासणे
अधिक माहिती: रुग्णाला (रक्तग्राही) रक्त चढवण्यापूर्वी त्याचा व रक्तदात्याचा रक्तगट जुळतो की नाही हे तपासणे महत्वाचे असते. रक्तदान करताना रक्तगट जुळल्यासच ते रक्त रुग्णाला दिले जाते. रक्त पराधनात रक्तगट न जुळल्यास रुग्णाच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या होऊन रुग्णाला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे रुग्ण दगावण्याचाही संभव असतो. A रक्तगटाच्या व्यक्तीला A व O गटाचे रक्त चालते. B रक्तगटाच्या व्यक्तीला B व O गटाचे रक्त चालते. AB Rh +ve रक्तगटाच्या व्यक्तीला A, B, AB व O या सर्व गटाचे रक्त चालते (सर्वयोग्य ग्राही) O रक्तगटाच्या व्यक्तीला फक्त O गटाचेच रक्त चालते, मात्र O Rh –ve गटाचे रक्त इतर सर्व रक्तगटाला चालते. (सर्वयोग्य दाता) Rh –ve रक्तगटाच्या रूग्णाला Rh –ve रक्तगटाचेच रक्त चालते मात्र Rh +ve रक्तगटाच्या रुग्णाला Rh +ve व Rh –ve दोन्ही गटाचे रक्त चालते.