Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘White fungus’ in Marathi
‘White fungus’ चा मराठी अर्थ
शब्द: White fungus
उच्चार: व्हाइट फंगस
अर्थ: कॅंडिडायासिस, कॅंडिडा नावाच्या बुरशीमुळे होणारा संसर्ग
अधिक माहिती: Candida नावाची बुरशी मनुष्याच्या शरीरावर दमट व ओल्या भागामधे (जांघेमधे, जननांगाजवळ) आढळते मात्र ती सहसा मनुष्यामधे आजार निर्माण करत नाही कारण मनुष्याची प्रतिकारक्षमता या बुरशीला शरीरात प्रवेश करून संसर्ग करू देत नाही. मात्र काही रोगांमुळे, किंवा अन्य कारणांमुळे रोगप्रतिकारक्षमता कमी झाल्यास ही बुरशी संसर्ग निर्माण करू शकते. मनुष्याची रोगप्रतिकारक्षमता कमी करणार्या औषधांमुळे ही या बुरशीच्या संसर्गाला संधी मिळू शकते. Candidia बुरशी चा संसर्ग झालेल्या ठिकाणी त्वचेवर पांढरे चट्टे निर्माण होतात म्हणून याला व्हाइट फंगस (पांढरी बुरशी) असे म्हणतात मात्र ते शास्त्रीय नाव नाही. Candidiasis ची लक्षणे म्हणजे त्वचेवर संसर्गाच्या ठिकाणी मुख्यतः तोंडात गालाचा आतला भाग, जीभ, तोंडाचा वरचा भाग इ वर पांढरे चट्टे निर्माण होतात. येणे ही आहेत. अधिक गंभीर स्थितीत कॅंडिडा बुरशी रक्तात प्रवेश करू शकते या स्थितीला Candidemia असे म्हणतात.Candidiasis ची लक्षणे आढळल्यास त्वरीत वैद्यकिय सल्ल्याने उपचार घ्यावेत.