Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Vegetative propagation’ in Marathi
‘Vegetative propagation’ चा मराठी अर्थ
शब्द: Vegetative propagation
उच्चार: व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन
अर्थ: शाकीय प्रजनन, शरीराच्या भागांची स्वतंत्र वाढ होऊन होणारे प्रजनन
अधिक माहिती: हा वनस्पतींमधे आढळणारा अलैंगिक प्रजननाचा प्रकार आहे. यात शरीराच्या भागातील पेशी नवीन वनस्पती म्हणून वाढू लागतात. उदा. कलम करणे, उसाच्या पेरावरील डोळे, जमीनीवर पसरलेल्या फांद्यांना मूळ फुटणे, प्रायोफिलम च्या पानांपासून नवीन वनस्पती तयार होणे, टिश्यु कल्चर इ.