Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Vegetative fertilization’ in Marathi
‘Vegetative fertilization’ चा मराठी अर्थ
शब्द: Vegetative fertilization
उच्चार: व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशन
अर्थ: वनस्पतीतील शाकीय फलन, वनस्पतीच्या बीजामधील एन्डोस्पर्म हा व्हेजिटेटिव्ह टिश्यु (शाकीय/शरीरपेशींनी बनलेली उती) निर्माण करणारे फलन
अधिक माहिती: ‘सिनगॅमी’ (दोन जननपेशींचे एकत्रीकरण) आणि ‘ट्रिपल फ्यूजन’ (तीन पेशी केंद्रकांचे एकत्रीकरण) ही अँजिओस्पर्म (म्हणजे अवृत्तबीजी गटातील सपुष्प वनस्पती) मध्ये लैंगिक पुनरुत्पादनादरम्यान घडणाऱ्या दोन स्वतंत्र फलनाच्या घटना आहेत (डबल फर्टिलायझेशन). परागीभवनानंतर पहिले फलन होण्याच्या थोडावेळ आधी मध्यभागी असलेले दोन एकगुणी (हॅप्लॉइड) केंद्रके एकत्र होतात व द्विगुणी (डिप्लॉइड) दुय्यम पेशीकेंद्रक (secondary nucleus) बनवतात. या द्विगुणी (डिप्लॉइड) दुय्यम पेशीकेंद्रकाला डेफिनिटिव्ह न्युक्लिअस असेही म्हणतात. हे द्विगुणी पेशीकेंद्रक द्विफलन प्रक्रियेतील दुसऱ्या फलन क्रियेत भाग घेते. ज्यात परागनलिकेतून आलेल्या दोन नर युग्मकांपैकी दुसरा नर युग्मक (मेल गॅमेट) द्विगुणी दुय्यम पेशीकेंद्रकासोबत एकत्र होतो व त्रिगुणी भ्रूणपोष पेशीकेंद्रक बनवतो. अशाप्रकारे तीन केंद्रकांच्या एकत्रीकरणाने म्हणजेच Triple fusion प्रक्रियेने ‘त्रिगुणी आद्य भ्रूणपोष पेशीकेंद्रक’ तयार होते. ट्रिपल फ्यूजन (तीन न्युक्लिअसचे एकत्रीकरण) हे एक प्रकारचे व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशन आहे कारण यातून निर्माण होणारे त्रीगुणी पेशीकेंद्रक हे पुढे बीज विकसित होताना विभाजीत होत जाते व बीजामधील एन्डोस्पर्म (बीजातील भ्रूणपोष) ही शरीरपेशींनी बनलेली उती निर्माण करते.