Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Valency’ in Marathi
‘Valency’ चा मराठी अर्थ
शब्द: Valency
उच्चार: व्हॅलंसी
अर्थ: संयुजा
अधिक माहिती: एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या म्हणजे त्या अणुची संयुजा होय. अणूंची संयुजा त्याच्या बाह्यतम कवचाच्या इलेक्ट्रॉन संरूपणावरून ठरते. बाह्यतम कवचाची जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन धारक क्षमता पूर्ण करण्यासाठी किती अधिक इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे किंवा बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन इतर अणुंना सहज दान करून इलेक्ट्रॉन संरूपण स्थिर करून अष्टक स्थिती प्राप्त करता येईल का यावर त्या मूलद्रव्याची valency किंवा संयुजा ठरते. ज्या मूलद्रव्यात संयुजा इलेक्ट्रॉन संख्या चार किंवा त्यापेक्षा कमी असते त्या मूलद्रव्याची संयुजा त्यातील संयुजा इलेक्ट्रॉन संख्येएवढी असते (कारण हे इलेक्ट्रॉन दान करून द्वीक किंवा अष्टक स्थिती प्राप्त करता येते). याउलट, ज्या मूलद्रव्यात चार किंवा त्याहून अधिक इलेक्ट्रॉन असतात तेव्हा अष्टक पूर्ण होण्यासाठी जितके इलेक्ट्रॉन कमी असतात, ती उणीवेची संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची संयुजा असते (कारण तेवढे इलेक्ट्रॉन मिळवून द्वीक किंवा अष्टक स्थिती प्राप्त करता येते).