Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘The art of herbarium’ in Marathi
‘The art of herbarium’ चा मराठी अर्थ
शब्द: The art of herbarium
उच्चार: द आर्ट ऑफ हर्बेरिअम
अर्थ: हर्बेरिअमची कला, हर्बॅरिअम मधे जतन करण्यासाठी वनस्पतीचा वाळवलेला नमुना तयार करण्याची कला
अधिक माहिती: हर्बेरिअमची कला ही इटली या देशातील वर्गीकरणशास्त्रज्ञ लुका घिनी यांनी सोळाव्या शतकात शोधली होती. हर्बेॅरियम साठी नमूना तयार करतान वाळवलेल्या स्वरूपातील कोरड्या वनस्पती चा नमुना असतो जो तो जतन करण्यासाठी ठराविक मानक आकारा च्या कागदावर वर दाब देउन, प्रक्रिया करून बसविला जातो. कागदाच्या खालच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात त्या वनस्पतीची माहिती व इतर तपशील, तपशिलवार वर्गीकरण, ती वनस्पती जिथून जमा केली ते ठिकाण, ज्या तारखेला जमा केली तो दिनांक आणि त्या वनस्पतीची पर्यावरणीय वैशिष्ट्ये नोंदविलेली असतात. त्यात त्या वनस्पतीचे स्थानिक नाव आणि ज्या संग्राहकाने जमा केले त्याचे नाव ही जोडले जाऊ शकते.