Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Suberin’ in Marathi
‘Suberin’ चा मराठी अर्थ
शब्द: Suberin
उच्चार: सुबेरिन
अर्थ: हे लांब श्रृंखला असलेले स्निग्धाम्ल (फॅटी ॲसिड) आणि ग्लिसरॉल यांच्यापासून बनलेले जटिल पॉलीस्टर (इस्टरचे बहुवारक) असते.
अधिक माहिती: सुबेरिन हे वनस्पतींच्या पेशीभित्तिकेमधे आढळते. सुबेरिन हे पेशीभित्तिकेमधून पाणी व विद्राव्य घटकांच्या आवगमनाला प्रतिबंध करते. नैसर्गिक कॉर्क/बाटलीचे बुच मधे हे मोठ्या प्रमाणावर आढळते. ज्या प्रजातीच्या ओक झाडाच्या जाड सालीपासून कॉर्क/बाटलीचे बुच बनवले जाते त्या क्वेर्कस सुबेर (Quercus suber) या नावापासून सुबेरिन हे नाव देण्यात आलेले आहे.