Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Structure of Anther’ in Marathi
‘Structure of Anther’ चा मराठी अर्थ
शब्द: Structure of Anther
उच्चार: स्ट्रक्चर ऑफ अँथर
अर्थ: अँथर ची रचना
अधिक माहिती: अपरिपक्व अवस्थेमधे Anther (परागकोष) हे इपिडर्मिस च्या एका स्तराने वेढलेल्या पॅरेन्कायमेटस टिश्यू (मूल उती) च्या स्वरूपात असते. विकसित परागकोषामधे होताना काही हायपोडर्मल पेशी (बाह्यत्वचेखालील पेशी) या आर्किस्पोरीअल सेल्स (स्पोर पूर्वीची पेशी) मध्ये रूपांतरित होतात. अँथर (परागकोश) हे सामान्यत: डायथिकस (दोन भाग असलेले) आणि टेट्रास्पोरॅंजीएट (चार स्पोरॅंजीअम/ स्पोर च्या चार पिशव्या असलेले) असतात. मॅच्युअर (परिपक्व) ॲथर मधे बाहेरील अँथर वॉल लेयर्स (अँथरच्या भिंतींचे थर) आणि आतील स्पोरोजिनस टिश्यू हे भाग असतात. स्पोरोजिनस टिश्यू पासून पोलन ग्रेन (परागकण) बनतात.