Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Structure of Anatropus ovule’ in Marathi
‘Structure of Anatropus ovule’ चा मराठी अर्थ
शब्द: Structure of Anatropus ovule
उच्चार: स्ट्रक्चर ऑफ अॅनाट्रॉपस ओव्ह्युल
अर्थ: अधोमुखी ओव्ह्युल, खालच्या दिशेने तोंड असणार्या स्त्रीबीजांडाची रचना
अधिक माहिती: Anatropus ovule म्हणजे असे ओव्ह्युल ज्याचे मुख/द्वार (मायक्रोपाइल) हे खालच्या दिशेला तर पाया (चलाझा) हे वरच्या दिशेला असते. अॅंजियोस्पर्म वनस्पतींमध्ये, ओव्ह्यूल चा सर्वात सामान्य प्रकार हा अॅनाट्रॉपस प्रकारचा असतो. ओव्ह्यूल (स्त्रीबीजांड) च्या शिखरावर/वरच्या टोकावर असलेल्या अरुंद/ बारीक छिद्राला मायक्रोपाईल (स्त्रीबीजांडाचे द्वार) असे म्हणतात. अॅनाट्रॉपस ओव्ह्युलमधे मायक्रोपाईल (स्त्रीबीजांडाचे मुख/द्वार) ही खालच्या दिशेने तोंड असलेले असते आणि ते फ्युनिक्युलस (ओव्ह्युलचे देठ) ला लागून असते. मायक्रोपाईल मधून पोलन ट्यूब (परागनलिका) ही ओव्ह्यूलच्या आत प्रवेश करू शकते. ओव्ह्युल म्हणजेच स्त्रीबीजांडाच्या पायाला चलाझा असे म्हणतात. चलाझा हा ओव्ह्युलमधे मायक्रोपाईल (ओव्ह्युलचे छिद्र) च्या थेट विरुद्ध बाजूला असतो. ओव्ह्यूल (स्त्रीबीजांड) मध्ये सेंट्रल (मध्यवर्ती) पॅरेन्कायमेटस टिश्यू (मूल उती) असतो ज्याला न्यूसेलस असे म्हणतात. न्यूसेलस हे सामान्यत: दोन संरक्षणात्मक आवरणांद्वारे वेढलेले असते ज्यांना इण्टेग्युमेंट्स असे म्हणतात. ओव्ह्युलच्या संरक्षक आवरणांना इंटेग्युमेंट्स असे म्हणतात. सामान्यत: दोन इंटेग्युमेंट्स हे ओव्ह्युलमधील न्यूसेलस (स्त्रीबीजांडाचा मध्यवर्ती भाग) ला वेढतात.हे इंटेग्युमेंट्स म्हणजेच आऊटर इन्टेग्युमेंट आणि इन्नर इन्टेग्युमेंट.