Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Stop watch’ in Marathi
‘Stop watch’ चा मराठी अर्थ
शब्द: Stop watch
उच्चार: स्टॉप वॉच
अर्थ: कालावधी मोजण्याचे घड्याळ
अधिक माहिती: एखादी घटना घडण्यासाठी किती वेळ लागतो हे मोजण्यासाठी या प्रकारचे घड्याळ वापरले जाते. या घड्याळातील काट्याची सुरूवात शून्यापासून होते. घटना सुरू होताच घड्याळाची कळ दाबली जाते व घड्याळ कालमापन सुरू करते. घटना संपल्यावर पुन्हा कळ दाबल्यास घड्याळ कालमापन बंद करते. घड्याळात दिणारा कालावधी नोंदला जातो. या प्रकारची घड्याळे शर्यतीत वेळ मोजण्यासठी तसेच वैज्ञानिक प्रयोगात कालावधी मोजण्यासाठी वापरली जातात.