Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Science fiction’ in Marathi
‘Science fiction’ चा मराठी अर्थ
शब्द: Science fiction
उच्चार: सायंस फिक्शन
अर्थ: विज्ञान काल्पनिका, काल्पनिक विज्ञानकथा
अधिक माहिती: Science fiction हे साहित्यक्षेत्रातील एक कथाप्रकार आहे. विज्ञान काल्पनिकांमधे विज्ञानातील संकल्पना केंद्रभागी ठेवून त्याभोवती रोचक कथानक गुंपले जाते. विज्ञानातील संकल्पना शोध यांचे मानवी जीवनावर व अस्तित्वावर होणरा परिणाम विज्ञानकथांमधून मांडला जातो. विज्ञानसंकल्पना व त्याला कल्पनाशक्तीची जोड मिळाल्याने अत्यंत विस्मयकारक कथानकं मांडली जातात. सायंस फिकशन हे लघुकथा, कथा, कादंबरी, दूरचित्रवाणी मालिका किंवा चित्रपटाच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळतात.उदा. आयझॅक असिमॉव्ह यांनी लिहिलेली ‘I, Robot’ ही कादंबरी व ‘Foundation’ सिरिज व त्यावर आधारीत चित्रपट. Science fiction या कथाप्रकारातील हजारो चित्रपट व मालिका बनलेल्या आहेत.