Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Rutherford’s scatterring experiment’ in Marathi
‘Rutherford’s scatterring experiment’ चा मराठी अर्थ
शब्द: Rutherford’s scatterring experiment
उच्चार: रुदरफोर्डस स्कॅटरिंग एक्सपरिमेंट
अर्थ: रूदरफोर्ड यांनी केलेला विकीरण प्रयोग
अधिक माहिती: अणू कशाचा बनलेला असतो या प्रशाचे उत्तर शोधण्यासाठी अर्नेस्ट रूदरफोर्ड ह्या वैज्ञानिकाने हा प्रयोग केला होता. रूदरफोर्ड यांनी सोन्याच्या अतिशय पातळ पत्र्यावर किरणोत्सारी मूलद्रव्यातून उत्सर्जित होणाऱ्या धन (+) प्रभारित अल्फा कणांचा मारा केला. सोन्याच्या पत्र्याभोवती प्रतिदीप्तीमान पडदा (जो त्यावर अल्फा किरण पडल्यास त्या ठिकाणी प्रकाशमान होतो) लावाला ज्याद्वारे अल्फा किरण कुठल्या दिशेने जात आहेत हे कळेल. या प्रयोगात असे दिसले की बहुसंख्य अल्फा कण पत्र्यातून आरपार सरळ गेले, काही थोडे अल्फा कण त्यांच्या मूळ/सरळ मार्गापासून लहान कोनामधून विचलीत झाले, तर खूप थोडे अल्फा कण मूळ मार्गापासून मोठ्या कोनातून विचलित झाले आणि अतिशय कमी संख्येने काही अल्फा कण मूळ मार्गाच्या सरळ उलट दिशेने परत आले. या प्रयोगातील निरिक्षणांच्या आधारे रुदरफोर्ड यांनी केंद्रकीय अणूप्रारूप 1911 साली मांडले.