Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Right Heart’ in Marathi
‘Right Heart’ चा मराठी अर्थ
शब्द: Right Heart
उच्चार: राइट हार्ट
अर्थ: उजवे हृदय
अधिक माहिती: मानवी हृदयाच्या आतील भागात एक उभा पडदा असतो त्यामुळे हृदयाचे डावे व उजवे असे दोन भाग पडतात. हृदयाचा उजवा भाग हा शरिरातील अवयवांकडून उर्ध्वमहाशिर (सुपेरिअर व्हेना कॅव्हा) व अधोमहाशिर (इनफेरिअर व्हेना कॅव्हा) मार्फत आलेले ऑक्सिजनविरहित (ऑक्सिजन वापरले गेलेले) रक्त हे डाव्या व उजव्या पल्मोनरी आर्टरी (फुफ्फुस धमन्या) मार्फत फुफ्फुसाच्या डाव्या व उजव्या भागाकडे पोहोचवण्याचे कार्य करतो. शरिरातील अवयवांकडून उर्ध्वमहाशिर (सुपेरिअर व्हेना कॅव्हा) व अधोमहाशिर (इनफेरिअर व्हेना कॅव्हा) मार्फत आलेले ऑक्सिजनविरहित (ऑक्सिजन वापरले गेलेले) रक्त उजव्या हृदयाच्या वरच्या कप्प्यात म्हणजे उजवे अलिंद (राइट ॲट्रिअम) मधे जमा होते. उजवे अलिंद (राइट ॲट्रिअम) आकुंचन पावल्यावर त्रिदली झडपेतून (ट्रायकस्पीड व्हाल्व्ह) रक्त उजव्या निलयामधे (राइट व्हेंट्रिकल) मधे उतरते. उजवे निलय आकुंचन पावल्यावर हे ऑक्सिजनविरहित रक्त डाव्या व उजव्या पल्मोनरी आर्टरी (फुफ्फुस धमन्या) मार्फत फुफ्फुसाच्या डाव्या व उजव्या भागाकडे पोहोचवले जाते. हे रक्त परत हृदयात उलटे येऊ नये यासाठी पल्मोनरी आर्टरी (फुफ्फुस धमन्या) च्या सुरुवातीला सेमील्युनार व्हॉल्व्ह (अर्धचंद्राकृती झडप) असते.