Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Right atrium’ in Marathi
‘Right atrium’ चा मराठी अर्थ
शब्द: Right atrium
उच्चार: राइट ॲट्रिअम
अर्थ: उजवे अलिंद
अधिक माहिती: हृदयाच्या चार कप्प्यांपैकी उजव्या भागातील वरच्या कप्प्याला उजवे अलिंद (राइट ॲट्रिअम) असे म्हणतात. उजव्या अलिंदामधे शरिरातील अवयवांकडून उर्ध्वमहाशिर (सुपेरिअर व्हेना कॅव्हा) व अधोमहाशिर (इनफेरिअर व्हेना कॅव्हा) मार्फत ऑक्सिजनविरहित (ऑक्सिजन वापरले गेलेले) रक्त येते. ते रक्त उजवे अलिंद (राइट ॲट्रिअम) मधे जमा होते. उजवे अलिंद (राइट ॲट्रिअम) आकुंचन पावल्यावर त्रिदली झडपेतून (ट्रायकस्पीड व्हाल्व्ह) रक्त उजव्या निलयामधे (राइट व्हेंट्रिकल) मधे उतरते.