Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Period of menstruation’ in Marathi
‘Period of menstruation’ चा मराठी अर्थ
शब्द: Period of menstruation
उच्चार: पिरिअड ऑफ मेन्स्ट्रुएशन
अर्थ: रजोस्रवाचा काळ, मासिक रक्तस्रावाचा काळ
अधिक माहिती: ओव्ह्युलेशन (अंडमोचन) नंतर अंडपेशीचे फलन 24 तासात जर झाले नाही तर ओव्हरीमधील पितपिंड (कॉर्पस ल्युटिअम) अकार्यक्षम होते व त्याचे रूपांतर श्वेतपिंड (कॉर्पस ॲल्बिकन्स) मधे होते. यामुळे इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या दोन्ही संप्रेरकांचे स्त्रवणे पूर्ण पणे थांबते व या संप्रेरकांच्या अभावामुळे गर्भाशयाचा अंतःस्तराचे (एन्डोमेट्रिअमचे) विघटन होण्यास सुरुवात होते व एन्डोमेट्रिअम (अंतःस्तर) च्या ऊती आणि अफलित अंडपेशी (अनफर्टिलाइझ्ड एग) चे अवशेष रक्रस्रावासह योनीमार्गाद्वारे बाहेर टाकले जाते. हा रक्तस्राव मासिक ऋतुचक्राची सुरुवात असते. हा रक्तस्त्राव साधारणतः पाच दिवस सुरु राहतो. या रक्तस्रावाला ऋतुस्त्राव किंवा मासिक पाळी असे संबोधतात.