Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Pentomino’ in Marathi
‘Pentomino’ चा मराठी अर्थ
शब्द: Pentomino
उच्चार: पेन्टोमिनो
अर्थ: पंचचौरसाकृती, पंचचौरसपट, पाच चौरसांची मांडणी
अधिक माहिती: Pentomino म्हणजे पंचचौरसाकृती ही अशाप्रकारची आकृती आहे की ज्यात पाच समान आकाराचे चौरस (स्वेअर) त्यांच्या कडा जूळवून मांडलेल्या असतात. एकुण विविध 12 प्रकारे चौरसांची मांडणी करता येते. त्या प्रत्येक आकृतीला पेंटोमिनो असे म्हणतात. (अशा प्रकारच्या आकृतीप्रकाराला Polyomino आकृती असे म्हणतात.) पुठ्ठ्याला विशिष्ट pentomino आकारात कापून त्याला घड्या पाडून त्याला घनाकृती (क्युब) उघड्या डब्यासारखा आकार देता येतो. यालाच पाच चौरसांची घडण किंवा घनाकृती उघड्या डब्याची घडण असे म्हणतात.
पुढील व्हिडिओमधे पेंटोमिनोचे विविध 12 प्रकार दाखवलेले आहेत.