Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Peer review’ in Marathi
‘Peer review’ चा मराठी अर्थ
शब्द: Peer review
उच्चार: पीअर रिव्ह्यु
अर्थ: सहकार्यांकडून तपासणी, त्याच क्षेत्रातील जाणकारांकडून गुणवत्तेची पडताळणी
अधिक माहिती: विज्ञान पत्रिकांमधे शोधपत्रिका व लेख प्रसिद्ध करण्यापुर्वी ते लेख त्यांची अचुकता व विश्वसनियता वैज्ञानिक कसोट्यांवर पडताळण्यासाठी त्या क्षेत्रातील इतर नामवंत शास्त्रज्ञांकडे पाठवली जातात. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना संशोधन लेख सादर करणाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळावी लागतात. या प्रक्रियेनंतर जाणकारांकडून संशोधनाच्या गुणवत्तेबाबत सकारत्मक अहवाल मिळाल्यानंतरच ते शोध विज्ञानपत्रिकेमधे प्रसिद्ध केले जातात.