Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Ozone layer’ in Marathi
‘Ozone layer’ चा मराठी अर्थ
शब्द: Ozone layer
उच्चार: ओझोन लेअर
अर्थ: ओझोन या वायूचा बनलेला स्तर
अधिक माहिती: ओझोन हा ऑक्सिजन च्या तीन अणूंपासून बनलेला रेणू आहे (O3). ओझोन वायूचा स्तर हा स्थितांबर / stratosphere या वातावरणाच्या दुसर्या स्तराच्या खालच्या बाजूला असतो. ओझोन वायूचा स्तर हा सुर्यापासून पृथ्वीकडे येणारे अल्ट्राव्हायोलेट रेज किंवा अतिनील किरण शोषून घेतो. अल्ट्राव्हायोलेट रेज किंवा अतिनील किरण हे सजीवांसाठी हानिकारक असतात. अशाप्रकारे वातावरणातील ओझोन स्तर हा पृथ्वीवरिल सजीवांचे संरक्षण करतो. ओझोनचे महत्व लोकांना समजावे यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस ‘ओझोन संरक्षण दिवस’ / ‘ozon protection day’ म्हणून मानला जातो.