Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Monozygotic twins’ in Marathi
‘Monozygotic twins’ चा मराठी अर्थ
शब्द: Monozygotic twins
उच्चार: मोनोझायगॉटिक ट्विन्स
अर्थ: एकयुग्मजी जुळे, एकाच झायगोटच्या विभाजनामुळे जन्मलेले जुळे
अधिक माहिती: Monozygotic twins किंवा एकयुग्मजी जुळी अपत्ये एकाच युग्मनजापासून (झायगोट/फलितांड पासूअन ) तयार होतात. गर्भ/भ्रूणाच्या वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये (म्हणजे युग्मनज/झायगोट तयार झाल्यापासून 8 दिवसांच्या आत) भ्रूणातील पेशी अचानक दोन भागामध्ये विभागल्या जातात. भ्रूणपेशींचे हे दोन्ही भाग दोन वेगळे-वेगळे भ्रूण म्हणून गर्भाशयात वाढू लागतात. त्यांची पूर्ण वाढ झाल्यानंतर मोनोझायगॉटिक /एकयुग्मजी जुळे जन्माला येतात. अशी जुळी अपत्ये जनुकीय दृष्ट्या तंतोतंत सारखीच असतात. त्यामुळे ही अपत्ये दिसण्यास तंतोतंत सारखीच असतात व त्यांचे लिंग समानच असते.