Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Osmosis’ in Marathi
‘Osmosis’ चा मराठी अर्थ
शब्द: Osmosis
उच्चार: ऑस्मॉसिस
अर्थ: परासरण
अधिक माहिती: पाण्याची (द्रावक) जास्त संहिता (कॉन्सन्ट्रेशन) असलेल्या भागाकडून पाण्याची कमी संहिता असलेल्या भागाकडे अर्ध पारपटलातून (सेमिपरमिएबल मेंब्रेन) होणारे पाण्याचे वहन म्हणजे Osmosis किंवा परासरण होय. उदाहरण म्हणजे अर्ध पारपटलाच्या भिंतीने वेगळे केलेल्या दोन भागांमधील एका भागात जास्त खारट पाणी (जास्त मीठ विरघळलेले) व अर्ध पारपटलाच्या पलिकडच्या दुसर्या भागात कमी मीठ विरघळलेले तेवढेच पाणी ठेवल्यास हळूहळू पाणी कमी मिठ विरघळलेल्या कप्प्यातून अर्ध पारपटलामधून जास्त मीठ विरघळलेल्या भागाकडे जाऊ लागते. पाण्याचे हे वहन तोपर्यंत चालू राहते जोपर्यंत दोन्ही भागातील पाण्यातील मिठाचे प्रमाण समान होत नाही. (या प्रयोगात वापरलेले पारपटल हे अर्धपारपटल प्रकारचे आहे म्हणजेच ते पाण्याला आरपार जाऊ देते मात्र मीठाच्या रेणूंना आरपार जाऊ देत नाही.) परासरण ही सजिवांमधे घडणारी महत्वाची भौतिक क्रिया आहे. परासरणातील वर्तनुकीनुसार द्रावणाचे 3 प्रकार केले जातात. ते म्हणजे अतिपरासरी द्रावण (Hypertonic solution), समपरासरी द्रावण (Isotonic solution), अवपरासरी द्रावण (Hypotonic solution).