Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Open heart surgery’ in Marathi
‘Open heart surgery’ चा मराठी अर्थ
शब्द: Open heart surgery
उच्चार: ओपन हार्ट सर्जरी
अर्थ: रुग्णाची छाती उघडून केलेली हृदयशस्त्रक्रिया
अधिक माहिती: या शस्त्रक्रियेत रुग्णाची छाती काप देउन उघडली जाते व त्यानंतर हृदयातील स्नायू, रक्तवाहिन्या, झडपा इ. वर शस्त्रक्रिया केली जाते. यात हृदयावर चालू स्थितीत किंवा हृदय बंद करून शस्त्रक्रिया केली जाते. हृदय बंद करून शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णाचे रक्ताभिसरण कृत्रिम यंत्राद्वारे चालू ठेवला जातो. बायपास सर्जरी ही देखील या प्रकारची शस्त्रक्रिया आहे.