Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Nuclear explosion’ in Marathi
‘Nuclear explosion’ चा मराठी अर्थ
शब्द: Nuclear explosion
उच्चार: न्युक्लिअर एक्स्प्लोजन
अर्थ: अणुविस्फोट
अधिक माहिती: केंद्रकीय विखंडनाच्या शृंखला अभिक्रियेद्वारे घडवलेला प्रचंड उर्जेचा विस्फोट. उदा. युरेनिअम-235 ह्या अणुइंधनाच्या अणुकेंद्रकांवर मंद गतीच्या न्यूट्रॉनांचा मारा केला असता युरेनिअम-235 च्या केंद्रकाचे विखंडन होऊन क्रिप्टॉन-92 व बेरिअम-141 ह्या वेगळ्या मूलद्रव्यांची केंद्रके व 2 ते 3 न्यूट्रॉन निर्माण होतात व प्रचंड प्रमाणात उर्जा उत्सर्जीत होते. ह्या न्यूट्रॉनांची गती कमी केल्यावर ते आणखी युरेनिअम-235 (U-235) केंद्रकांचे विखंडन घडवतात त्यातून निर्माण झालेले न्युट्रॉन आणखी युरेनिअम-235 केंद्रकांचे विखंडन घडवतात. अशा प्रकारे केंद्रकीय विखंडनाची chain reaction किंवा शृंखला अभिक्रिया होते यामध्ये केंद्रकातून मोठ्या प्रमाणात केंद्रकीय ऊर्जा म्हणजेच अणुऊर्जा मुक्त होते. ही शृंखला अभिक्रिया नियंत्रित न केल्यास प्रचंड विस्फोट होऊ शकतो.