Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Neutron’ in Marathi
‘Neutron’ चा मराठी अर्थ
शब्द: Neutron
उच्चार: न्युट्रॉन
अर्थ: न्युट्रॉन, अणुकेंद्रकातील प्रभाररहित अवअणुकण
अधिक माहिती: न्यूट्रॉन अणुकेंद्रकात आढळणारा अवअणुकण आहे. न्यूट्रॉन हा विद्युतप्रभारदृष्ट्या उदासीन असतो म्हणजे त्यावत कुठलाही विद्युतप्रभार नसतो. न्युट्रॉनचा निर्देश ‘n’ ह्या संज्ञेने करतात. केंद्रकातील न्यूट्रॉन संख्येसाठी ‘n’ ही संज्ञा वापरतात. एका न्यूट्रॉनचे वस्तुमान सुमारे 1 u (unified mass) इतके आहे, म्हणजेच जवळजवळ प्रोटॉनच्या वस्तुमानाइतकेच आहे. 1 u इतके अणुवस्तुमान असलेल्या हायड्रोजनमधे न्युट्रॉन नसतो. त्याव्यतिरिक्त इतर सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकांमध्ये न्यूट्रॉन असतात.