Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘MRI scan’ in Marathi
‘MRI scan’ चा मराठी अर्थ
शब्द: MRI scan
उच्चार: एम आर आय स्कॅन
अर्थ: चुंबकिय क्षेत्र व रेडिओ लहरींचा वापर करुन शरिरांतर्गत भागातील कापचित्र /छेदचित्रे मिळवणे
अधिक माहिती: Magnetic resonance imaging म्हणजेच MRI scan तंत्राचा वापर करून शरीराच्या आतील भागांचे कापचित्र /छेदचित्र तसेच त्रिमितीय चित्र मिळवता येते. या यंत्रामधे न्युक्लिअर मॅग्नेटिक रेझोनंस म्हणजे चुंबकीय क्षेत्रामधे हायड्रोजन अणू (जे पाणी व जैविक पदार्थांमधे विपुल प्रमाणात असतात) च्या केंद्रकांच्या परिवलनाची भौतिक स्थिती विशिष्ट रेडिओ लहरींचा वापर करून उत्तेजित केली जाते व त्यामुळे झालेले केंद्रकांचे धृवीकरण चुंबकीय क्षेत्राद्वारे नोंदवले जाते व या माहितीचा वापर करून शरिरांतर्गत भागातील कापचित्रे तयार केली जातात.