Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Biological museum’ in Marathi
‘Biological museum’ चा मराठी अर्थ
शब्द: Biological museum
उच्चार: बायोलॉजिकल म्युझिअम
अर्थ: जैवीक संग्रहालय
अधिक माहिती: Biological museum हि अशी ठिकाणे आहेत जिथे जतन केलेल्या वनस्पती आणि प्राणी यांच्या शरीरांचे स्पेसीमेन (नमुने) चे संग्रह ठेवलेले असतात. वनस्पती आणि प्राण्यांचे नमुने हे पारदर्शक काचेच्या बरण्यांमध्ये फॉर्मेलिन (formalin) च्या द्रावणामध्ये बुडवलेल्या स्थितीत ठेवलेले असतात. हे नमुने ठेवलेल्या बरण्यांवर नाव व माहितीची पट्टी लावली जाते. जैवीक संग्रहालयांमधे पक्षी आणि प्राण्यांचे भुसा भरून नैसर्गिक जिवंत स्वरुपासारखे जतन केलेले शरीराचे बाह्यस्वरूप हे प्रदर्शनासाठी ठेवलेले असतात. यासोबतच हाडांचे सांगाडे, जीवाश्म, मॉडेल्स, बाह्यकवच, किटकांचे, फुलपाखरांचे विविध प्रकार संरक्षीत स्वरूपात बघण्यास मिळतात.