Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Molecular formula’ in Marathi
‘Molecular formula’ चा मराठी अर्थ
शब्द: Molecular formula
उच्चार: मॉलिक्युलर फॉर्म्युला
अर्थ: रेणुसूत्र, रासायनिक सूत्र, विशिष्ट रसायनाच्याएका रेणूचे संघटन दर्शवणारे सूत्र
अधिक माहिती: संयुगामध्ये घटक मूलद्रव्यांचे प्रमाण ठराविक असते. संयुगाच्या रेणूमध्ये घटक मूलद्रव्यांचे अणू विशिष्ट संख्येने एकमेकांना जोडलेले असतात. संयुगाच्या एका रेणूमध्ये कोणकोणत्या मूलद्रव्याचे प्रत्येकी किती अणू आहेत ते रेणुसूत्राच्या साहाय्याने दर्शवले जाते. रेणुसूत्रामधे सर्व घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा व प्रत्येक संज्ञेच्या पायाशी त्या त्या अणूंची संख्या, ही माहिती समाविष्ट असते. उदा. H₂O (पाणी), CH₄ (मिथेन), C₆H₁₂O₆ (ग्लुकोज) इ.