Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Mock drill’ in Marathi
‘Mock drill’ चा मराठी अर्थ
शब्द: Mock drill
उच्चार: मॉक ड्रिल
अर्थ: सराव कवायत, खर्या परिस्थितीसारखी खोटी परिस्थिती निर्माण करून त्या परिस्थितीत कसे वागावे याचे प्रशिक्षण किंवा सराव करणे याला मॉक ड्रिल किंवा सराव कवायत असे असे म्हणतात
अधिक माहिती: उदा. आग लागल्यास किंवा भूकंप झाल्यास किंवा दहशतवादी हल्ला झाल्यास काय करावे यासाठी कर्मचारी जसे की अग्निशामक दलातील कर्मचारी, जनता, विद्यार्थी, पोलिस इ. ना प्रशिक्षण देण्यासाठी त्याप्रकारची खोटी परिस्थीती निर्माण केली जाते. यांनाच fire drill, earthquake drill इ. म्हणतात.