Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Metabolism’ in Marathi
‘Metabolism’ चा मराठी अर्थ
शब्द: Metabolism
उच्चार: मेटॅबॉलिझम
अर्थ: चयापचय, जैवरासायनिक क्रिया
अधिक माहिती: Metabolism म्हणजे चयापचय क्रिया होय. सजीवांच्या शरिरामधे तसेच शरीरातील पेशींमधे सतत जैवरासायनिक प्रक्रिया सुरु असतात. या जैवरासायनिक प्रक्रिया अन्नपचन करून पोषण मिळवण्यासाठी किवा अन्नपचनातून मिळालेल्या पोषक तत्वांचा वाढीसाठी वापर करण्यासाठी व उर्जा मिळवण्यासाठी घडतात. या क्रियांना मेटाबॉलिक क्रिया म्हणजेच चयापचय क्रिया असे म्हणतात. मेटाबॉलिक क्रियांमधे कॅटाबोलिक आणि अॅनाबॉलिक क्रियांचा समावेश होतो. कॅटाबोलिक क्रियांमधे जटिल रेणू तोडून त्याचे घटक रेणू मिळवले जातात किंवा रेणूचे विघटन केले जाते. उर्जानिर्मितीसाठीच्या रासायनिक अभिक्रिया या कॅटाबॉलिक प्रकारच्या असतात. अॅनाबॉलिक क्रियांमधे साधे घटक रेणू जोडून जटिल रेणू बनवला जातो. शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या जैवरासायनिक अभिक्रियांचा समावेश अॅनाबॉलिक क्रियांमधे होतो. (Metabolism = Catabolism + Anabolism).